महापालिका निवडणुकींचा धुरळा ; काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?


पुणे : नगरपंचायत व नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.या यादीत माजी मंत्री, आमदार, खासदार, महाराष्ट्र प्रभारी यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही यादी फायनल करण्यात आली आहे. या यादीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. शाहू महाराज छत्रपती,रेवंत रेड्डी, पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट, बाळासाहेब थोरात, मोहम्मद अझरुद्दीन, रजनीताई पाटील, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, इम्रान प्रतापगढी, चंद्रकांत हंडोरे,आरिफ नसिम खान, राज बब्बर, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, अमिन पटेल, डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, अमित देशमुख, डॉ. विश्वजीत कदम, भाई जगताप, अनिस अहमद,रमेश बागवे, हुसेन दलवाई, साजीद खान पठाण, कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, प्रा. वसंत पुरके, मुझफ्फर हुसेन, एम. एम. शेख, मोहन जोशी, डॉ. वजाहत मिर्झा, अतुल लोंढे,सिध्दार्थ हत्तिअंबीरे, हनुमंत पवार आदींचा यात समावेश आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडे स्टार प्रचारकांची यादी पाठवण्यात आली आहे.दोन दिवसापूर्वी नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. भाजपाने 117 जागा जिंकल्या असून, 288 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस एकमकेांच्या विरोधात लढूनही चांगलं यश मिळवण्यात यशस्वी ठरले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!