अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाणार? पुण्यातील हालचालींमुळे राजकारण वेगळ्या वळणावर..


पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये मतदान 15 जानेवारीला पार पडेल, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

तसेच या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकारण केंद्रस्थानी आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील संभाव्य आघाडीमुळे राज्याचं लक्ष पुण्याकडे लागलं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली पकड असल्याने दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

याच चर्चांना आणखी बळ मिळालं आहे ते शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्यामुळे, ज्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शशिकांत शिंदे यांनी पुण्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांची व्यापक आघाडी उभारण्याचा प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचं संकेत दिले आहेत.

या आघाडीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसह उद्धव ठाकरे गटाची शिवसेनाही सहभागी होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव अजित पवार यांच्यासमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

       

या घडामोडींमुळे अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असून 25 किंवा 26 डिसेंबर रोजी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यास प्रशांत जगताप यांनी सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला आहे. दोन्ही गटांनी एकत्र येण्याची अधिकृत घोषणा झाल्यास आपण पक्षाचा राजीनामा देऊ, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे शरद पवार गटासमोर अंतर्गत नाराजी सांभाळण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!