पुण्यात राजकीय वारं फिरलं ; अजित पवारांना आणखी एक कार्यकर्ता नडला, पोस्ट करत थोपाटले दंड

पुणे :राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना अजित पवार गटातील पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे.अजित पवारांच्या खास शिलेदाराने थेट पक्षाविरोधात दंड थोपाटले आहेत. अजित पवार गटाचे माजी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून अजित पवार गट सोडण्याचे संकेत दिले आहेत.त्यामुळे महापालिकेच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे.
महायुतीतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून अनेकजण अजित पवारांची साथ सोडत आहेत.आता ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरपवारांच्या खास शिलेदाराने थेट पक्षाविरोधात दंड थोपाटले आहेत. अजित पवार गटाचे माजी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून अजित पवार गट सोडण्याचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी निवडणूक लढण्याचा ठाम विश्वास देखील व्यक्त केला आहे.
दरम्यान युवराज बेलदरे साथ सोडत असल्याने अजित पवार यांना पुण्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बेलदरे यांनी पक्षातील स्थानिक नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत पक्षातून बाहेर पडण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. इतरांमुळे मला निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ज्यांनी माझा प्रवास बिघडवला त्यांना पण शुभेच्छा, अशी उपहासात्मक पोस्ट लिहून बेलदरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच त्यांनी पोस्टमध्ये “मला आणि माझ्या आंबेगावला कमी लेखणाऱ्यांनो आता वेळ सुद्धा माझी असेल आणि निकाल सुद्धा याच भूमिपुत्राच्या बाजुने असेल”, अशा शब्दांत बेलदरे यांनी पोस्ट लिहिली आहे. मी अजित पवारांचा केवळ कार्यकर्ता नव्हतो, त्या व्यक्तीवर माझं विशेष प्रेम आहे आणि भविष्यात देखील असेल, मात्र इतरांमुळे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. असंही बेलदरे म्हणाले आहेत.

