भयंकर! बीअरची फुटकी बाटली, बारकोड अन् 72 तासांत कशी झाली गुन्ह्याची उकल, नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : तुटलेल्या बिअरच्या बाटलीचा वापर करून एका इसमाच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना राजधानी दिल्लीतील करोल बाग परिसरात घडली आहे. या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी आता धक्कादायक खुलासा केला आहे.
फॉरेन्सिक तपासणीतून मिळालेल्या एका छोट्या पण महत्त्वाचा सुगावा निर्णायक ठरला आणि त्याच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. १५ डिसेंबरच्या रात्री करोल बाग येथील अजमल खान पार्कमध्ये घडलेल्या या धक्कादायक गुन्ह्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित इसम हा त्याच्या मित्रासोबत पार्कमध्ये रील शूटिंग करत असताना, जवळच मद्यपान करणाऱ्या तीन तरुणांनी अश्लील कमेंट्स करायला सुरुवात केली. पीडित व्यक्तीने त्यांचा विरोध करण्याचा प्रयत्न केल्यावर वाद सुरू झाला.

बघता बघता भांडण चांगलंच पेटलं आणि हिंसक झालं. संतापाच्या भरात एका आरोपीने बीअरची बटली फोडली आणि त्याच्या धारधार काचेने पीडित व्यक्तीवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात पीडित माणूस गंभीर जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असताना तो जागीच कोसळला. आजूबाजूच्या लोकांनी हा प्रकार पाहिला आणि त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेलं, तिथल्या डॉक्टरांनी वेळेवर उपचार करून त्याचा जीव वाचवला.

मात्र हत्येच्या प्रयत्नामुळे खूप खळबळ माजली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, करोल बाग पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला, आणि तपासासाठी एक विशेष पथक स्थापन केले.
तपासादरम्यान, पोलिसांना त्या पार्कमध्ये एका बिअरच्या बाटलीचा तुटलेला तुकडा सापडला, ज्यावर बारकोड होता. हा बारकोड या प्रकरणात महत्त्वाचा सुगावा ठरला. पोलिसांनी बारकोडच्या आधारे जवळच्या दारूच्या दुकानांत जाऊन तपास केला आणि त्या दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तर त्याच पार्कच्या परिसरात जे इतर सीसीटीव्ही होते, त्यामध्ये हत्येचा प्रत्यानंतर आरोपींनी पळूज जाण्यासाठी जी स्कूटी वापरली ती कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती.
दरम्यान, CCTV फुटेज एकत्रित करून, पोलिसांनी तिन्ही संशयितांची ओळख पटवली. 18 डिसेंबर रोजी पोलिसांनी हम्माद उर्फ रिजवान, कामरान उर्फ सरीम आणि फरजान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, तिघांनीही गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली. त्यांनी पीडित व्यक्तीकडे फक्त माचिस मागितली होती, पण जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा त्यांच्या वाद पेटला आणि त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले अशी कबुली आरोपींनी दिली.
