महाराष्ट्र पुन्हा गारठणार, राज्यातील ‘या ‘8 जिल्ह्यात थंडीची लाट, हवामान विभागाचा अंदाज काय?

पुणे :गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे.तापमानात मोठी घट झाली असुन उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा घसरला आहे. ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे
पुणे शहरात गेल्या आठ दिवसांत हवेतील प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. हिवाळ्यातील वारे आणि वाढते बांधकाम व वाहने यामुळे प्रदूषणाचे कण हवेतच साठून राहत आहेत. पुण्यात अनेक भागांत एअर क्वालिटी इंडेक्स १८० च्या पार पोहोचला आहे.
. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तास मुंबई आणि पुणे करांसाठी थंडीचे दिवस असतील
प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांत तापमानात मोठी घट होणार आहे. काही ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली जाण्याची शक्यता असल्याने पिकांनाही याचा फटका बसू शकतो.

दरम्यान मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. धुक्यामुळे रस्ते आणि महामार्गावर सकाळी ५ ते ९ या वेळेत दृश्यमानता कमालीची घटली आहे. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच अपघाताची शक्यता टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

