अजित पवारांनी जलवा दाखवला! पुणे जिल्ह्यात 17 पैकी 10 नगरपालिका काबीज करून विरोधकांना दिला दे धक्का…

पुणे : राज्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पार पडल्या आहेत. त्यानंतर आज या निवडणुकींचे निकाल जाहीर आहेत.
गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता एकहाती सत्ता राखलेल्या अजित पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त होऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र नगरपरिषदांचे निकलसमोर येताच स्पष्ट झाले आहे की, अजित पवार हेच पुणे जिल्ह्याचे कारभारी आहेत. अजित दादांनी पुणे जिल्हावर पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे.
एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहराची अजित पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख होती. परंतु, त्यांच्या बालेकिल्ल्याला भाजपने 2017 मध्ये सुरुंग लावला. 15 वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता भाजपने उलथवून टाकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकडे विशेष लक्ष दिले.

मात्र निवडणुका जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी पुणे , पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पुण्यामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली. अजित पवारांचे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. जिल्ह्यातील 17 पैकी 10 जागा एनसीपी पार्टीकडे, 1 जागा युतीकडे आहे. निकालानंतर अजित दादांचा जलवा पुणे जिल्हात कायम असल्याचे दिसून आले आहे.

पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा…
1 लोणावळा – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
2 तळेगाव – बहुमत राष्ट्रवादीचा मात्र नगराध्यक्ष भाजपचा
3 दौंड- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
4 चाकण – शिवसेना शिंदे गट
5 शिरूर- बहुमत भाजपचा आणि नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
6 इंदापूर- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
7 सासवड – भाजप
8 जेजुरी – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
9 भोर – बहुमत भाजपला मात्र नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
10आळंदी – भाजप
11 जुन्नर – शिवसेना शिंदे
12 राजगुरुनगर – शिवसेना शिंदे गट
13 बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
14 फुरसुंगी- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
जिल्ह्यातील नगरपंचायती….
1 वडगाव मावळ – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
2 मंचर – शिवसेना शिंदे
3 माळेगाव – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडून आलेले नगराध्यक्ष पक्ष
१७ पैकी १० ठिकाणी अजित पवार
१ बारामती- सचिन सातव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
२ लोणावळा – राजेंद्र सोनवणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
३ तळेगाव – संतोष दाभाडे – भाजपा महायुती
४ दौंड – दुर्गादेवी जगदाळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
५ चाकण – मनीषा गोरे – शिवसेना
६ शिरूर – ऐश्वर्या पाचरणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
७ इंदापूर – भरत शाह – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
८ सासवड – आनंदी काकी जगताप – भाजपा
९ जेजुरी – जयदीप बारभाई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
१० भोर – रामचंद्र आवारे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
११ आळंदी – प्रशांत कुराडे – भाजपा
१२ जुन्नर – सुजाता काजळे – शिवसेना एकनाथ
१३ राजगुरुनगर – मंगेश गुंडा – शिवसेना एकनाथ शिंदे
१४ वडगाव मावळ – आंबोली ढोरे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
१५ मंचर – राजश्री गांजले – शिवसेना एकनाथ शिंदे
१६ माळेगाव – सुयोग सातपुते – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
१७ उरुळी फुरसुंगी – संतोष सरोदे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार
