निकालाचा धुरळा! नगरपरिषद -नगरपंचायतच्या निवडणुकीत ‘देवा’चंच वर्चस्व, महायुतीच्या सर्वाधिक जागा, इतरांच्या वाट्याला किती?

पुणे :राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची अपेक्षा केली जात असताना प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी शिवसेना (शिंदे), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात लढत झाली.आणि संघर्ष उडल्याचं दिसून आलं. आता निकाल समोर आला असून राज्यात महायुतीचच वर्चस्व असल्याच समोर आल आहे.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार, महायुती सर्वाधिक 216 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडी 49 जागांवर आघाडीवर आहे. नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये देवाभाऊंचंच वर्चस्व पहायला मिळतं आहे तर शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राइक रेटसुद्धा तगडा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपल्या पक्षांसाठी संपूर्ण राज्य पिंजून काढलं होतं. याचा सकारात्मक परिणाम या निकालांमध्ये दिसत आहे. आतापर्यंत महायुती 216 (भाजप 118, शिवसेना 60, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 37 ) मविआ- 49 (काँग्रेस 33, शिवसेना (ठाकरे गट) 9, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 8) स्थानिक आघाडी – 23 आघाडीवर आहे.

गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर घेतल्या गेल्या. पहिल्या टप्प्यात 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर 2 आणि 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आज (21 डिसेंबर) मतमोजणी होत असून सर्वाधिक जागांवर महायुतीच आघाडीवर असल्याचं पहायला मिळत आहे.

