कोल्हापूरमध्ये मुश्रीफ-घाटगेंची युती फेल, शिंदेंच्या शिवसेनेनं फडकावला झेंडा

कोल्हापूर:राज्यभरात नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निकालाचे कल हाती आले आहे. कोल्हापूरमधील मुरगुड नगरपरिषदेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं झेंडा फडकावला आहे.शिवसेना शिंदे गटाचे १६ नगरसेवक विजयी झाले आहे. याचा मोठा धक्का हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे यांना बसला आहे
नगर पंचायत आणि नगर परिषदा निवडणुकीसाठी कागल आणि मुरगुडमध्ये कट्टर विरोधक असलेले हसन मुश्रिफ आणि समरजीत घाटगे एकत्र आले होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे पॅनेल उभं होतं. त्यामुळे या दोन नगरपरिषदेत चुरस निर्माण झाली होती. अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे १६ नगरसेवक विजयी झाले आहे. तर शिवसेनेच्या नगराध्यक्षपदी सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील विजयी झाले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त ४ जागांवर विजय मिळाला आहे.

दरम्यान कागलच्या राजकारणामध्ये शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे एकत्र आल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणामध्ये मोठी चर्चा रंगली होती. कागलमध्ये दोघाना यश मिळालं असलं, तरी मात्र मुरगुडमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.

शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाच्या सुहासिनी देवी पाटील यांनी नगराध्यक्षपदी विजय मिळवला. नगरपालिकेवर सत्ता सुद्धा मिळवली आहे. त्यामुळे मुश्रीफ आणि घाटगे यांना तगडा झटका बसला आहे.
