काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांचं निधन ; वयाच्या 94 वर्षी घेतला अखेरचा श्वास


पुणे :काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं काल निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या त्या पत्नी होत्या. वयाच्या 94 वर्षी मुंबईतील माहीम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट करून माजी मंत्री शालिनीताई पाटील यांच्या निधनाची माहिती दिली.शालिनीताई पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. त्या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. आज त्यांनी मुंबईत माहिम येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्य संस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनाने कांग्रेसवर शोककळा पोहोचली आहे. शालिनीताई यांनी वसंतदादांना खबीर साथ दिली होती. मात्र आता त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

काय आहे रोहित पवार यांची पोस्ट?

माजी मंत्री शालिनीताई पाटील यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. मा. मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या धर्मपत्नी असल्या तरी राजकारणात मात्र त्यांनी स्वतःचं स्वतंत्र असं स्थान निर्माण केलं होतं. लढाऊ बाणा आणि स्पष्टवक्त्या राजकारणी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील एक युग काळाच्या पडद्याआड गेले. या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना आणि वसंतदादांच्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मिळो, ही सदिच्छा! भावपूर्ण श्रद्धांजली. अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पोस्ट लिहिली आहे.

       

शालिनीताई पाटील या मंत्री आणि आमदार म्हणून एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी मराठा आरक्षणासाठीही आवाज उठवला होता, मात्र त्यांना नेत्यांची आणि जनतेची साथ मिळाली नव्हती. साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी शालिनीताईंना मातेसमान दर्जा देत सदैव साथ दिली. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शालिनीताईंचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण असा केला होता. शालिनीताई या ए.आर अंतुलेच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या महसूलमंत्री होत्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!