पुण्यातील इंदापूर पालिकेवर कुणाची सत्ता? जनतेचा कौल कोणाला असणार?


पुणे :राज्यातील 288 नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून 288 पालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे कोण होणार नगराध्यक्ष, कुणाची सत्ता येणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली असताना पुण्यातील इंदापूर पालिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे. यामध्ये जनता कोणाला कौल देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये अनेक वर्षे हर्षवर्धन पाटील यांचा दबदबा राहिला आहे. पण याच इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत शहा हे इंदापूरचे संभाव्य नगराध्यक्ष असू शकतात. अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या इंदापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे दहा ते बारा नगरसेवक निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथील जनतेने राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिल्याचं दिसून येत आहे.

तसेच सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत शहर विकास आघाडीचे राजेंद्रसिंह यादव हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबतच या निवडणुकीत शहर विकास आघाडीचे 18 नगरसेवक निवडून येतील, असा अंदाज वर्तवला आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!