मोठी बातमी! राज्यातील 23 नगरपरिषद -नगरपंचायतीच्या मतदानाला सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला ;उद्या निकाल


पुणे:राज्यातील २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. १४३ सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूकीसाठी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.ही निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्या 21 डिसेंबर रोजी राज्यातील 288 नगरपालिका आणि नगरपंचायतीचा निकाल लागणार आहे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.

राज्यातील अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, अनगर, मंगळवेढा, महाबळेश्वर, फलटण, फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, वसमत, अंजनगाव सूर्जी, बाळापूर, यवतमाळ, वाशिम, देऊळगावराजा, देवळी, घुग्घूस या सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे.

       

कोणत्या ठिकाणी होणार मतदान?

नाशिक- (नगर परिषद) सिन्नर, चांदवड, ओझर, पालघर- पालघर नगरपरिषद, वाडा नगर पंचायत, रत्नागिरी- रत्नागिरी नगर परिषद, ठाणे- अंबरनाथ नगर परिषद, बदलापूर नगर परिषद, अहिल्यानगर- (नगर परिषद) देवळाली-प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, जामखेड, राहुरी, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा, श्रीरामपूर, नेवासा नगर पंचायत, जळगाव- (नगर परिषद) अमळनेर, भुसावळ, पाचोरा, सावदा, वरणगाव, यावल, कोल्हापूर- गडहिंग्लज नगर परिषद, पुणे- (नगर परिषद) बारामती, फुरसुंगी, दौंड, लोणावळा, तळेगाव, सांगली- शिराळा नगर पंचायत, सातारा- (नगर परिषद) महाबळेश्वर, फलटण, कराड, मलकापूर, सोलापूर- (नगर परिषद), मंगळवेढा, मैंदर्गी, मोहोळ, पंढरपूर, बीड- (नगर परिषद) अंबेजोगाई, बीड, किल्ले धारूर, परळी, छत्रपती संभाजीनगर- (नगर परिषद) गंगापूर, पैठण, वैजापूर, फुलंब्री नगर पंचायत, धाराशिव- (नगर परिषद) धाराशिव, उमरगा, हिंगोली- वसमत नगर परिषद, हिंगोली नगर परिषद, जालना- भोकरदन नगर परिषद, लातूर- रेणापूर नगर पंचायत, निलंगा नगर परिषद, उदगीर, नांदेड- (नगरपरिषद) धर्माबाद, मुखेड, कुंडलवाडी, भोकर, लोहा, परभणी- (नगर परिषद) जिंतूर, पूर्णा, अकोला- बाळापूर नगर परिषद, अमरावती- (नगर परिषद) अंजनगाव सुर्जी, अचलपूर, दर्यापूर, वरुड, धारणी नगर पंचायत, बुलढाणा- (नगर परिषद) देऊळगाव राजा, जळगाव, खामगाव, शेगाव, वाशिम- वाशिम नगर परिषद, रिसोड नगर परिषद, यवतमाळ- (नगर परिषद) यवतमाळ, वणी, पांढरकवडा, दिग्रस, भंडारा- भंडारा नगर परिषद, चंद्रपूर- (नगर परिषद) घुग्घुस, बल्लारपूर, गडचांदूर, मूल, वरोरा, गडचिरोली- आरमोरी नगर परिषद, गडचिरोली नगर परिषद, गोंदिया- गोंदिया नगर परिषद, तिरोडा नगर परिषद, नागपूर- (नगर परिषद) कामठी, नरखेड, रामटेक, कोंढाळी नगर पंचायत, वर्धा- (नगर परिषद) देवळी, हिंगणघाट, पुलगाव, वर्धा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!