मध्यरात्री रस्त्यावर वाढदिवस साजरा करत असलेल्या तडीपार गुंडासह १३ जणांना अटक, तीन फरार…


लोणी काळभोर : मध्यरात्री भररस्त्यात तडीपार गुंडांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बेकायदेशीर जमाव जमवून वाहतुकीचा रस्ता अडवून गोंधळ घातल्याप्रकरणी तडीपार गुंडासह १३ जणांना अटक करण्यात आली आहे. तर तीन जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत.सदर प्रकार गुरुवार (१८ डिसेंबर) रोजी मध्यरात्री उघडकीस आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या काही तासाच्या आत १३ जणांना अटक केली आहे.

याप्रकरणी तडीपार गुंड राज रविंद्र पवार, नटराज शिवाजी कदम, प्रेम तानाजी गायकवाड (सर्व रा. गुजरवस्ती कवडीपाट टोलनाका कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) याचेसमवेत प्रविण लक्ष्मण नाझीरकर (वय २१), ओम गणेश चव्हाण (वय २०), हर्षद नारायण चव्हाण (वय २१), आदित्य दादा गायकवाड (वय १९), अनिल मानसिंग होमणे (वय ३०), हर्षल शंकर जगताप (वय १९ ), अनिकेत महेश जांभळे (वय २३), सनी जयवंत भोसले (वय १९), सौरभ संतोष मस्के (वय १९), अभिषेक महेश जांभळे (वय २५ ), महेश संपत नाझीरकर (वय १९), कृष्णा सुरेश आरण (वय १९, सर्व रा. जेजुरी ता. पुरदंर जि. पुणे) व सुदाम गुलाब चव्हाण (वय १९ रा. वासुली फाटा, म्हाळुंगे चाकण ता. खेड जि. पुणे) यांना गुन्हा दाखल. झाले नंतर काही वेळातच अटक करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज पवार हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्याला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.

       

गुरुवारी राज पवार याचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे अनेक तरुण मित्र कदमवाकवस्तीत आले होते. पवार व जमलेल्या त्याच्या मित्रांनी यावेळी बेकायदेशीर जमाव जमवून, मध्यरात्री वाहतुकीचा रस्ता अडविला व मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. तसेच राज पवार याचा जयघोष करीत हत्यार हवेत भिरकावून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.

सदर प्रकार लोणी काळभोर पोलीसांना कळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. व १३ जणांना ताब्यात घेतले. यावेळी तिन जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ जणांना अटक करण्यात आली आहे. तर फरार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!