पुण्यात शरद पवारांना धक्का, विश्वासू शिलेदाराची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

पुणे :आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा केली आहे.सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी राजकारणातून सन्यास घेतल्याची माहिती दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय असलेले माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.दक्षिण पुण्यात विशाल तांबेच वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. गेले तीन वेळेस नगरसेवक राहिलेले विशाल तांबे यांनी केलेली कामे आणि आपण का थांबत आहोत याची माहिती पोस्टमध्ये लिहीत राजकारणातून संन्यास घेतला.

सलग तीन वेळा पुणे महापालिका नगरसेवक म्हणून विशाल तांबे निवडून आले होते. माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्षपद ही भूषवले आहे. २००७,२०१२ आणि २०१७ सलग तीन वेळेस धनकवडी परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. अचानक सोशल मीडियावर पोस्ट करत राजकारणातून निवृती जाहीर केली.

दरम्यान राजकारण थांबवत असलो तरी समाजकारण आणि निस्वार्थ सेवा सुरू राहील अशी भावना व्यक्त करत राजकारणातून संन्यास घेतला आहे. दक्षिण पुण्यात होता विशाल तांबे याचा चांगला संपर्क आहे. ऐन निवडणुकीतून त्यांनी राजकारणाला रामराम ठोकल्याने पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे.
