सर्वसामान्यांना नवीन वर्षाचं मिळणार गिफ्ट, गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?, महत्वाची माहिती आली समोर….


पुणे : येणारे वर्ष तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि काही चांगली बातमी घेऊन येईल. १ जानेवारी रोजी तुम्ही नवीन वर्ष साजरे करत असताना, सरकार तुम्हाला गिफ्ट देखील देऊ शकते. कारण १ जानेवारी २०२६ पासून गॅसच्या किमतीत बदल होण्याची चर्चा जोर धरू लागली असून, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात होऊ शकते.

तसेच दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल आणि गॅसच्या किमतींचा आढावा घेतला जातो, त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, १ डिसेंबर २०२५ रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती १० रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. मात्र, घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात जाहीर झाल्यानंतर, एलपीजी सिलेंडरच्या दरातही घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

       

सरकारने १ जानेवारी २०२६ पासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमती प्रति युनिट २ ते ३ रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि घरगुती पाईप गॅस असलेल्या पीएनजीच्या दरात कपात झाल्यानंतर, आता घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो.

सध्या १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती मार्च २०२४ पासून स्थिर आहेत. दिल्लीमध्ये विनाअनुदानित सिलेंडरची किंमत ८०३ रुपये आहे, तर मुंबईत ८५२.५० रुपये इतकी आहे. कोलकातामध्ये हा दर ८७९ रुपये असून चेन्नईत ८६८.५० रुपये आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला नऊ सिलेंडरसाठी ३०० रुपयांची सबसिडी मिळते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!