संतोष देशमुखांच्या सुनावणीत कोर्टात ‘हाय व्होल्टेज ड्रामा ‘; मारेकरी सुदर्शन घुलेला गंभीर आजार? सुनावणी दरम्यान अचानक कोसळला


पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाच्या आजच्या सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत एक नाट्यमय घटना घडली.आरोपी सुदर्शन घुले याला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो खाली कोसळला.त्यामुळे घुलेला नक्की काय झालं? त्याला कोणता गंभीर आजार झाला आहे का? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणीच्या वेळी न्यायाधीशांनी आरोपीना पुकारले असता सुदर्शन घुले हा उपचार घेत होता, असं सांगितलं. त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजर केलं जात होत. यावेळी सुदर्शन घुले अचानक खाली पडला. त्यामुळे काही काळ न्यायालयात खळबळ उडाली.

दरम्यान देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना काढण्याची मागणी केली आहे. वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी ही मागणी केली आहे. निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, त्यामुळे त्यांना या प्रकरणातून बाजुला करावं, असा अर्ज न्यायालयाला दिला आहे. यावर आज कोर्टात सुनावणी सुरू आहे.

       

तसेच या हत्येवेळी काढण्यात आलेले व्हिडीओज आरोपींच्या वकिलांना द्यावेत, अशी मागणी देखील यावेळी आरोपींच्या वकिलांनी केली. घटनेदरम्यानचे व्हिडिओज आरोपी वकिलांना देण्यात यावे, मग आरोप निश्चिती केली जावी, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.

जे व्हिडीओ ट्रायल कोर्टात नाहीत, ते व्हिडिओ उच्च न्यायालयात दाखवले जातात आणि वातावरण भावनिक केले जाते, असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला. त्यामुळे सरकारी पक्षाकडून आजच आरोपीच्या वकिलांना व्हिडिओज फाइल दिले जाणार आहेत. या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!