कोल्हापूर हादरलं! पोटच्या मुलानेच केला घात,आई-वडिलांची निर्घृण हत्या ; धक्कादायक कारण समोर

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे मुलानेच आपल्या आई-वडिलांची हत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.आज पहाटे पाचच्या सुमारास ही हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर संशयीत स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. यावेळी त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपीचे नाव सुनिल नारायण भोसले (४८) असे आहे. तर मृत्यू झालेल्यांची नावे विजयमाला नारायण भोसले (७०) आणि नारायण गणपतराव भोसले (७८) अशी आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण भोसले आणि त्यांची पत्नी विजय माला आणि हल्लेखोर मुलगा यांच्यासह महावीर नगरमधील अल्फा लाईन गल्ली येथे वास्तव्यास होते. त्यांना तीन पत्ती असून थोरला मुलगा चंद्रकांत यांचे व संजय यांचे सराफी दुकान आहे. व्यवसाय निमित्ताने ते दोघेही बाहेरगावीच वास्तव्यास असतात. हल्लेखोर सुनील याच लग्न झाल असून त्याला एक मुलगा व मुलगी आहे.. पण त्याच्या सततच्या त्रासामुळे त्याची पत्नी मुलासह माहेरी बेळगाव येथे वास्तव्यास आहे.

गेल्या काही दिवसांपासून तो घराची वाटणी करून मिळावी यावरून आई-वडिलांशी सतत भांडत होता. मात्र आई-वडिलांनीं त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. वैतागलेल्या सुनीलने जन्मदात्या आई-वडिलांवर खुरपं, दगड,काठीने निर्दयीपणे हल्ला करून त्यांची हत्या केली.हत्या केल्यानंतर संशयीत स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. यावेळी त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.

या गंभीर घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनास्थळावर नागरीकांनी प्रचंड गर्दी केली होती. पोलिस प्रशासनासह मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाल्या असून पुढील तपासणी सुरू केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
