मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंची विकेट पडणार, नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात, अटक कधी?

पुणे:सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी आढळेले माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अखेर राज्यपालांनी मंजूर केला आहे.तर दुसरीकडे नाशिक पोलीसांचा फौंजफाटा लिलावती रुग्णालयात दाखल झाला असून कोणत्याही क्षणी त्यांनी अटक होण्याची शक्यता आहे. त्यांना आता अटक कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची आज सकाळी अँजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर डॉक्टर त्यांच्या डिस्चार्ज संदर्भात निर्णय घेणार आहेत. अँजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान कोकाटेंना अटक करण्यासाठी रात्रीच नाशिक पोलीस लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, आता कोकाटे यांना डिस्चार्जनंतर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने अशा काळात मंत्र्यांविरोधात अटक वॉरंट निघाल्याने सरकारवर मोठी टीका होत होती.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार कोकाटे यांना अभय देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असल्याने सरकारच्या प्रतिमेला धक्का लागत होता.त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांना थेट विचारणा केल्याने कोकाटे यांची कॅबिनेटमधून उचलबागडी अटळ असल्याचे संकेत दिसू लागले आहेत.

