भाजपचे मोठे धक्कातंत्र ; ‘या ‘दिग्गज आमदाराची तडकाफडकी उचलबांगडी

पुणे :राज्यात सध्या आगामी महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवरच आता भाजपने मोठा राजकीय फेरबदल करत दिग्गज आमदाराची तडकाफडकी उचलबांगडी केली असल्याची माहिती समोर आली आहे.नाशिक भाजपमध्ये आमदार राहुल ढिकले यांना पदावरून हटवण्यात आले आहे.
आमदार राहुल ढिकले हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांची गेल्याच महिन्यात निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करून पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला होता. मात्र आता त्यांची उचल बांगडी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
आमदार राहुल ढिकले यांची पदावरून तडकाफडकी उचलबांगडी केल्यानंतर त्यांच्या जागी देवयानी फरांदे यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे.नाशिक महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने सध्या कंबर कसली आहे.

दरम्यान गेल्या रविवारपासून शहरातील विविध विभागांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहे. या मुलाखतीची प्रक्रिया अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरु होती. त्यातच प्रदेश कार्यालयाकडून निवडणूक प्रमुख बदलल्याचा आदेश धडकला. विशेष म्हणजे, आमदार राहुल ढिकले हे स्वतः मुलाखत प्रक्रियेत सक्रिय असतानाच त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

