ऐन निवडणुकीच्या तोंडवर मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्यानं सोडली ठाकरेंची साथ….


चंद्रपूर : राज्यामध्ये महापालिका निवडणूका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. तसेच राज्यात सध्या महापालिका निवडणुकीवरुन वातावरण तापले आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधी दोन्हीही पक्षात तिकीट मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

येत्या १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर १६ जानेवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा पक्षांतराला वेग आला आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमींग सुरू झालं आहे.

आज काँग्रेसच्या नेत्या प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा हिंगोलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला देखील भाजपनं मोठा धक्का दिला आहे, बड्या नेत्यानं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्यानं शिवसेना ठाकरे गटासाठी मोधा धक्का मानला जात आहे.

युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले, पूर्व विदर्भ युवासेना सचिव तसेच विदर्भातील पहिले आणि एकमेव गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. निलेश बेलखेडे यांच्या प्रवेशामुळे विदर्भातील युवा वर्गात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!