धक्कादायक! आठवीच्या विद्यार्थिनीवर दोघांचा आळीपाळीने अत्याचार, कपडे घेऊन पळाले; पीडिता नग्नावस्थेत रस्त्यावर सापडली अन्…. सांगली येथील घटनेने राज्य हादरले..

सांगली : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे इयत्ता आठवीत शिकणार्या शाळकरी मुलीवर दोघा जणांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ईश्वरपूर पोलिसांनी या प्रकरणी सराईत गुन्हेगार ऋतीक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे या दोघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
संतापजनक म्हणजे अत्याचारानंतर पीडितेचे कपडे घेऊन दोघांनी पळ काढल्याने तिला जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत विवस्त्र चालत जावे लागले. दोघा नराधमांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित विद्यार्थिनी ही सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथील एका शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेते. पीडिता आईसोबत ईश्वरपूर येथे वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ऋतीक महापुरे याने पीडितेला फोन करून ईश्वरपूरमधील शिराळा नाक्यावर बोलावून घेतले. त्यानंतर ऋतीक आणि आशिष या दोघांनी तिला दुचाकीवरुन तुजारपूर फाट्यावरील एका ऊसाच्या शेतात नेले.

त्या ठिकाणी दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पीडितेकडे चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगिला. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे विद्यार्थिनीने विरोध केल्याने तिला मारहाणही करण्यात आली.
तसेच अत्याचार केल्यानंतर दोघांनी तिला विवस्त्र अवस्थेत तिथेच सोडले आणि तिचे कपडे घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला. त्यामुळे पीडितेला नग्न अवस्थेत ईश्वरपूरच्या दिशेने चालत जाण्याची वेळ आली. यावेळी काही जणांनी तिला पाहिलं आणि तातडीने कपडे पुरवले. तसंच याबाबत ईश्वरपूर पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान, पोलिसांनी पीडितेकडे चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
