मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, थेट राज्यपालांकडून मंजूर..


पुणे:सदनिका घोटाळा प्रकरणी जिल्हा न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती समोर आली होती. या दरम्यान आता त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांच्या खात्याची जबाबदारी असणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याआधी माणिकराव कोकाटे यांचे खाते काढण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती. राज्यपालांनी ही शिफारस मान्य केली. आता कोकाटे आपल्या पदावरून पायउतार झाले आहेत. रिक्त झालेल्या क्रीडा खात्याची जबाबदारी आता अजित पवार यांच्याकडे काही दिवस असणार आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात कोकाटे यांनी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. त्यानंतर कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. यामुळे कोणत्याही क्षणी त्यांची अटक होऊ शकते. कोकाटे मुंबईतील रूग्णालयात दाखल असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर ते राजीनामा कधी देणार यावरून चर्चा रंगताना दिसल्या. मात्र आता त्यांनी आपला राजीनामा अजित पवारांकडे सोपवला होता. त्यानंतर सर्व घडामोडी वेगाने घडल्या.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!