सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून CNG आणि PNG च्या किमती कमी होणार, किती असणार किंमत?


पुणे : अवघ्या काही दिवसांमध्ये २०२६ ला सुरूवात होणार आहे. या आगामी नवीन वर्षात सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि घरगुती पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या नॅचरल गॅस च्या किमती कमी होणार आहेत.

पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड ने १ जानेवारी २०२६ पासून लागू किमती कमी होणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे थेट ग्राहकांना आर्थिक फायदा होणार आहे.

वाहन इंधन म्हणून CNG चा वापर करणारे तसेच घरगुती स्वयंपाकासाठी PNG वापरणारे लाखो ग्राहक या निर्णयामुळे आनंदी झाले आहेत. PNGRB चे सदस्य ए. के. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या टॅरिफ रचनेमुळे प्रति युनिट २ ते ३ रुपयांपर्यंत बचत होणार असून, याचा थेट परिणाम अंतिम विक्री किमतींवर दिसून येईल.

PNGRB ने यापूर्वी लागू असलेली तीन झोनची टॅरिफ पद्धत रद्द करून आता दोन झोनची नवी युनिफाईड टॅरिफ रचना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२३ मध्ये अंतराच्या आधारे तीन झोन निश्चित करण्यात आले होते. त्यामध्ये २०० किलोमीटरपर्यंत ४२ रुपये, ३०० ते १२०० किलोमीटरसाठी ८० रुपये आणि १२०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी १०७ रुपये टॅरिफ लागू होती.

       

मात्र, आता ही प्रणाली सोपी करण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार, पहिला झोन संपूर्ण देशातील CNG आणि घरगुती PNG ग्राहकांसाठी लागू राहणार आहे. या झोनसाठी 54 रुपयांचा एकसमान टॅरिफ निश्चित करण्यात आला आहे, जो यापूर्वीच्या ८० ते १०७ रुपयांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. दरांचे तर्कसंगतीकरण केल्यामुळे वितरण खर्च कमी होऊन ग्राहकांना थेट फायदा देणे शक्य होणार आहे.

या नव्या दररचनेचा लाभ देशभरातील ४० शहर गॅस वितरण कंपन्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ३१२ भौगोलिक क्षेत्रांमधील ग्राहकांना मिळणार आहे. विशेषतः CNG वापरणाऱ्या वाहनचालकांना आणि घरगुती PNG वापरणाऱ्या कुटुंबांना याचा मोठा फायदा होणार आहे.

PNGRB ने स्पष्ट केले आहे की, CGD कंपन्यांनी या दरकपातीचा पूर्ण लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. यासाठी नियामक संस्था नियमितपणे दरांवर लक्ष ठेवणार असून, ग्राहकांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!