पुण्यातील 3 बडे नेते भाजप प्रवेशाच्या तयारीत, मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’वर होणार महत्त्वाच्या घडामोडी


पुणे :पुणे महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली असताना आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. खडकवासला, वडगाव शेरी, कोथरूड, पर्वती आणि हडपसर विधानसभा मतदारसंघांतील महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही प्रमुख उमेदवार हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यास पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी पुण्यातील प्रमुख नेत्यांची आज बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी नागपूर येथील निवासस्थानी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ; तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक झाली आहे. या बैठकीस हेच दोन नेते असणार, की अन्य स्थानिक नेतेही उपस्थित राहणार आहेत, याबाबत स्पष्टता नसली तरी सर्वांचे एकमत असलेल्या उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत.

दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील तीन प्रमुख नेत्यांच्या पक्षप्रवेशास मुख्यमंत्री फडणवीस यांनी तूर्त सबुरीने घेण्याचा सल्ला पुण्यातील पदाधिकाऱ्यांना दिल्याची चर्चा आहे. त्यामध्ये पर्वती, खडकवासला आणि कोथरूड येथील नेत्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश न देता आहे त्याच पक्षातून त्यांना लढू द्यावे, अशी भाजपची रणनीती आहे. या पक्ष प्रवेशावरही फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चेची एक फैरी झडल्यानंतरही युती आणि उमेदवारीचा तिढा न सुटल्याने आज, बुधवारी पुन्हा मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!