पुण्यात एकतर्फी प्रेमातून हत्याकांड;आरोपीला जन्मठेप अन् ५ हजार रूपयांचा दंड

पुणे:पुण्यातील बिबेवाडीमध्ये१५ वर्षांच्या राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा २२ वर्षांच्या शुभम याने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता पुणे न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल लावला असून आरोपी शुभम याला न्यायालयाने जन्मठेप अन् ५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
काय आहे प्रकरण?
२२ ऑक्टोबर २०२१ मध्ये पुण्यातील बिबवेवाडीमध्ये २२ वर्षाच्या शुभमच्या प्रेमाला १५ वर्षाच्या मुलीने स्पष्ट शब्दात नकार दिला. हा राग मनात धरून शुभमन त्या मुलीवर चाकूने २२ वेळा वार केले. त्यानंतर गळा चिरून मुलीचे धड शरीरापासून वेगळे केले होते.
त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली. मंगळवारी कोर्टाने शुभम याला जन्मठेपेची शिक्षा सुनवाली.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिला.

मृत मुलीच्या बहिणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरूवात केली. त्यांनी पुरावे गोळे केले. त्यांनी या प्रकरणात २२ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. काही प्रत्यक्षदर्शींनी आरोपीची कोर्टात ओळख पटवली. शुभमच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली. दरम्यान, मृत मुलगी ही आईवडिलांचे एकुलते एक अपत्य होती असा युक्तिवादही विशेष सरकारी वकील ॲड. हेमंत झंजाड यांनी कोर्टात केला. न्यायाधीशाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपयेचा दंड ठोठावला सुनवाली.

ते म्हणाले की, पोस्टमार्टम रिपोर्ट्नुसार मुलीच्या मृतदेहावर २५ जखमा आढळल्या. या गुन्ह्यासाठी मृत्युदंड किंवा जन्मठेप या दोनच तरतुदी आहेत. जन्मठेपेची शिक्षा ही आरोपीसाठी योग्य शिक्षा आहे.
