प्रियसीने प्रेमसंबंध तोडून दुसऱ्याशी केलं लग्न, रागाच्या भरात प्रियकराने केला प्रियसीच्या पतीचा खून, घटनेने सगळेच हादरले…

लोणी काळभोर : प्रेयसीने आपल्याशी असलेले प्रेमसंबंध तोडून दुसऱ्याशी लग्न केले या कारणांवरून चिडून जावून प्रियकराने प्रेयसीच्या पतीचा निर्घृणपणे खून केला असल्याची घटना पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावचे हद्दीत रामकाठी शेताचे शिवारात घडली आहे.
या घटनेत दिपक गोरख जगताप (वय २२, रा राजेवाडी ता पुरंदर जि पुणे) याचा खून झाला आहे. दिपक याचे मामा संतोष रोहीदास शेंडकर (वय ४६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस, ता. पुंरदर, जि. पुणे, मुळ रा. राहु, ता दौंड, जि पुणे) यांचेवर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पायल अमोल कांबळे (रा. वाघापुर) हिचे सुशांत मापारी याचेसोबत प्रेमसंबंध होते. ते झुगारून देऊन तिने एक महिन्यांपूर्वी मयत दिपक याचेशी विवाह केला होता.

याचा राग त्याचे मनात होता. लग्न झाले नंतर ते हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे रहावयास आले. मापारी हा तेथे येवून पायलचे लग्न माझेशी ठरले होते. तु का केलेस? अशी विचारणा करून तो दिपक याचेशी वाद घालत असे. सदर बाब त्याने आपल्या घरी सांगितली होती.

याच गोष्टीचा राग मनात धरून व त्याच कारणावरून सुशांत याने दिपक यास पायलचा पहीला मोबाईल घेवुन जाण्यासाठी व लग्नाचा बाद मिटविण्याचे बहाण्याने माळशिरस गावचे हद्दीत रामकाठी शेताचे शिवारात शनिवारी (१३) डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारांस बोलावुन घेतले. व दिपक गाफिल आहे हे लक्षात घेऊन त्याचेकडील धारधार लोखंडी कोयत्याने दिपकचे डोक्यात, मानेवर, पाठीवर, उजवे पायावर धारधार वार करून त्याचा निर्घृणपणे खुन केला व खुनासाठी वापरलेले हत्यार जागीच सोडुन सुशांत मापारी हा पळुन गेला आहे.
दिपक घरी आला नाही म्हणून कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. अखेर रविवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारांस त्याचा रक्तबंबाळ अवस्थेत मिळून आला. गुन्हा दाखल होताच फरार आरोपीच्या मागावर पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत.
