उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिंदवणे हातभट्टी चालकावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई ! पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रस्तावावर पुणे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई ..

उरुळी कांचन:हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील गावठी दारुची निर्मिती, विक्री व वाहतुक करणाऱ्या हातभट्टी चालकावर ‘एमपीडीए’ कायदयांतर्गत कारागृहात स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आल्याने हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्हयात सध्या चालु असलेल्या नगरपालिका व नगरपरीषदा निवडणुका तसेच आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही कारवाई केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात तसेच अवैध शस्त्र बाळगणारे, अंमली पदार्थांची विक्री करणारे, अवैध वाळु व्यवसाय करणारे, हातभट्टी दारुची निर्मिती करणारे, हातभटटीचे दारुची चोरुन वाहतुक करणारे, दारुचे गुत्ते चोरुन चालविणारे, यांची गुंडगिरी मोडीत काढणेसाठी हातभटटीवाले रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, यांचेविरुध्द कारवाईचा बडगा उगारुन ‘एमपीडिए’ कायदयांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण जिल्हयामधील पोलीस स्टेशनला दिलेले आहेत.

उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिंदवणे व सोरतापवाडी येथे वास्तव्यास असलेल्या गावठी दारुची निर्मिती, विक्री व वाहतुक करणाऱ्या क्रिश जॉनी राठोड (वय वर्षे २०, रा.काळेशिवार, शिंदवणे ता. हवेली जि. पुणे) यांचे विरुध्द यापुर्वी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ मधील तरतुदींनुसार गुन्हे दाखल आहेत. शिंदवणे, काळेशिवार आदी गावांत वेगवेगळया ठिकाणी गावठी हातभटटी ची दारु तयार करण्यासाठी भट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन, लोखंडी ड्रम, लाकडे याचे सहायाने गावठी हातभटटीची दारुची भट्टी लावली असताना, तसेच भटटी लावुन तयार झालेली गावठी हातभटटीचे दारुची विक्रीसाठी वाहतुक करणे, चोरुन दारुची भट्टी लावणे, दारुची विक्री करणेच्या धंदयाबाबत कोणी तक्रार केल्यास तो त्या तक्रदारास धमकावणे, यासारखे गुन्हे व तक्रार असल्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्यामुळे तसेच त्याच्या विरुध्द ऊरुळी कांचन पोलीस ठाण्यात ५ गुन्हे दाखल होते. तो सराईत हातभटटीवाला असल्याने त्याचेविरुध्द एमपीडीए कायदयांतर्गत कार्यवाही होणेकामी पोलीस निरीक्षक उरूळी कांचन सचिन वांगडे, यांनी पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल्ल, यांना प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रस्तावाचे अवलोकन पोलीस अधीक्षक यांनी करुन तो प्रस्ताव पुढील वाही करीता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांचेकडे पाठविला होता.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी राठोड याला सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरेल अशा प्रकारची कारने करण्यापासुन प्रतिबंध करण्याचे दृष्टीने त्यास महाराष्ट्र झोपडपटटीगुंड, हातभटटीवाले, औषधीद्रव्यविषयक गार, धोकादायक व्यक्ती, व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती (व्हिडीओ रेटस), वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणा-या, बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर री चालवणा-या आणि मानवी अपव्यापार करणा-या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत स्थानबध्द करण्याचा आदेश पारीत केले आहेत.
यांनुसार राठोड यास ऊरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, यांनी ऊरुळीकांचन पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले पोलीसांची वेगवेगळी पथके तयार करुन शोध घेवुन त्यास १३ डिसेंबर रोजी ताब्यात घेवुन मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे दाखल करुन स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी हि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौड उपविभाग बापुराव दडस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, ऊरुळी कांचन पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, पोलीस हवालदार योगेश नागरगोजे, काळे, सचिन जगताप, शैलेश लोखंडे, प्रवीण चौधर, निलेश जाधव, प्रशांत पवार, उध्दव गायकवाड, होले पो.कॉ सागर बोत्रे, राजकुमार भिसे, बंडु बालगुडे ऊरुळी कांचन पोलीस ठाणे यांनी केलेली आहे
