CBSC अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा 21 पानांचा इतिहास; देवेंद्र फडणवीसांची घोषणा


पुणे:राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे.विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. आता सीबीएसईच्या नवीन पुस्तकांमध्ये छत्रपती शिवरायांचा आणि मराठा साम्राज्याचा २१ पानांचा इतिहास घेतलेला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये मराठा साम्राज्यावर, हिंदवी साम्राज्यावर फक्त एक परिच्छेद होता. पण मुघलांचा इतिहास 17 पानांचा होता. पण आता हा इतिहास बदला आहे. आता सीबीएसईने छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा 21 पानांचा इतिहास अभ्यासक्रमात केंद्र सरकारने समाविष्ट केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते.

आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जो मार्ग दाखवला, त्यांच्या तत्त्वाने आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गाने महाराष्ट्र चालत राहील. छत्रपती शिवरायांचं तत्त्व महाराष्ट्राला मान्य होतेच, पण देशपातळीवर त्याबाबत अनेक संभ्रम होते. पण आता छत्रपती शिवरायांचा 21 पानांचा इतिहास CBSC अभ्यासक्रमात असणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान २०३० पर्यंत महाराष्ट्र देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!