पुणे हादरलं ;वडील कामानिमित्त पुण्यात, आई बाहेर गेल्याची संधी साधली, चिमुकलीला अत्याचार करुन संपवलं..

पुणे :विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.अशातच आता मावळमध्ये पाच वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मावळ परिसरात खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार,शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही पाच वर्षीय चिमुकली घरातून बेपत्ता झाली होती. रात्री उशिरा आई कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी घरी नसल्याचं लक्षात आलं. मुलीचे वडील गेल्या आठ दिवसांपासून कामानिमित्त पुण्यात गेले होते, तर आई जवळच्या कंपनीत काम करते. त्यामुळे चिमुकली अनेकदा घरात एकटीच असायची. याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने चिमुकलीला घराजवळच काही मीटर अंतरावर नेले आणि तिच्यावर बलात्कार करून गळा दाबून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात 30 ते 35 वयोगटातील विवाहित आरोपी समीर कुमार मंडळ याला पोलिसांनी अटक केली असून तो मूळचा झारखंडचा रहिवासी आहे.

दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हत्या झालेल्या चिमुकलीचे कुटुंब झारखंड येथील असून आरोपी हा पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. दोन्ही कुटुंबे रोजगारासाठी मावळ परिसरात वास्तव्यास होती. या घटनेने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

