लाडक्या बहिणींच्या मदतीला येणार’ ताई’; ई-केवायसीची अडचण दूर होणार…


पुणे:लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. लाभार्थी महिलांना ई -केवायसी करताना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही प्रक्रिया पूर्ण करताना ओटीपी मिळण्यात अडचणी येत होत्या. आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आता प्रत्यक्ष कागदपत्रांच्या आधारे ई केवायसी पूर्ण करता येणार असल्याची माहिती समोर आली आहे

ई -केवायसी साठी लाडक्या बहिणीच्या मदतीला आता अंगणवाडी सेविका येणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा देणारी पावले शासनाने उचलली आहेत. योजनेची ई-केवायसीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती, पण मोबाईलवर ओटीपी उपलब्ध होण्यात तांत्रिक अडचणी अजूनही आहेत.त्यामुळे आता आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत अंगणवाडी सेविकेकडे जमा करून ई-केवायसी करता येणार आहे.

ई-केवायसीची प्रक्रिया अनेक महिलांकडून अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यात अडथळे येत होते. मात्र, आता अंगणवाडी सेविका स्वतः महिलांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे तपासतील. या अंगणवाडी ताई आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात मोलाचा वाटा उचलणार आहे.

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये सन्माननिधी देण्यात येईल असे जाहीर केले होते. पण त्याची तारीख त्यांनी सांगितली नव्हती. याविषयी अनेकदा विरोधकांनी सरकारवर हल्ला केला आहे. सत्ताधाऱ्यांकडून योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. आता ती योग्य वेळ कोणती हा मात्र प्रश्न उपस्थित केला जात आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!