IAS अधिकारी तुकाराम मुंढेनां क्लीन चीट ; ‘ या ‘प्रकरणी चौकशीतून मोठा दिलासा

नागपूर:वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकरणात मुंडे यांना आता अधिकृतपणे क्लीन चिट मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी कथित भ्रष्टाचार तसेच लक्षवेधी सूचना दाखल केल्यानंतर मुंडेंनी धमकी दिल्याचा आरोप नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत केली होती. राज्यसेवेतील कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस तुकाराम मुंढे यांना त्यांच्याविरोधात झालेल्या या आरोपांमधून अधिकृतरीत्या क्लीन चीट मिळाली आहे. तुकाराम मुंढे यांना मंत्र्यांची विधानसभेत क्लिन चीट मिळाली आहे.तसेच ईओडब्लु व पोलिसांच्या चौकशीतही त्यांना क्लिन चीट दिल्याचे नमूद केले. फक्त महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी आहे. त्या अहवालावर पुढील कारवाई होणार आहे.
दरम्यान तुकाराम मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाची आर्थिक गुन्हे शाखेने सखोल पोलीस चौकशी केली होती.मात्र या चौकशीत त्यांचे विरोधात काहीही गैरव्यवहार आढळला नाही. खुदा राजाचे उद्योग मंत्री उदय सामत यांनी विधानसभेत हे महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्यावरील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले असून त्यांना या चौकशीतून मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंढे नागपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांच्यावर नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पातील नियुक्त्या व वादग्रस्त बदलीसंदर्भात अनेक आरोप करण्यात आले होते. मात्र, विधानसभेत मुंढे यांना आता क्लीन चीट दिली गेली आहे.

महिला कर्मचाऱ्यांकडून मुंढे यांच्याविरुद्ध दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. पहिल्या प्रकरणात, एका कराराच्या आधारे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास प्रसूती रजेबाबत वाद उद्भवला होता. मातृत्व लाभ कायद्यानुसार ८० दिवसांची सेवा आवश्यक असताना संबंधित महिला केवळ २१ दिवस कार्यरत होती, त्यामुळे तिला वेतनासह प्रसूती रजा नाकारण्यात आली होती.
तर दुसऱ्या प्रकरणात, एका महिलेनं मुंढे यांनी अयोग्य भाषेचा वापर केल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली होती. या प्रकरणात महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे अजून बाकी आहे.
मुंढे यांना वारंवार राजकीय हस्तक्षेप, गैरसमज आणि तथाकथित नेत्यांच्या दबावामुळे वारंवार बदलीचा सामना करावा लागतो, असे विधानसभेत त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते. तरीही, या सर्व आरोपांतून मिळालेल्या क्लीन चीटमुळे मुंढे यांच्या प्रशासकीय कामकाजाची पारदर्शकता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
