उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी रात्री आमदारांची बैठक ; काय झाली चर्चा?


मुंबई:आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुती ठरली असली तरी जागा वाटपाचा तिढा होण्याची दाट शक्यता आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी काल रात्री सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांशी वन टू वन चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.

निवासस्थानी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांशी वन टू वन चर्चा केली. विकास कामात कुठेही अडथळा येणार नाही असं उपमुख्यमंत्र्यांचे आमदारांना आश्वासन दिलं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकास कामांसाठी निधी कुठेही कमी पडणार नाही, यावर देखील चर्चा झाली. ठाकरेंच्या शिवसेनेला टीकेतून नाही तर कामातून उत्तर द्या असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच आगामी महापालिका निवडणुका या युती म्हणून लढायच्या आहेत, त्यामुळे महायुतीला गालबोट लागेल असे कुठेही वक्तव्य नको अशा सूचनाही यावेळी आमदारांना देण्यात आल्या. तर एकनाथ शिंदे यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे आमदारांनी स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीत आरे ला कारे होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीसाठी कल्याण-डोंबिवली, मुंबईत भाजपला अधिक जागा हव्यात आहेत. तर शिंदे सेना पण अनेक जागांसाठी आग्रही आहे. महापौर आणि इतर पद कुणाला मिळेल हे ठरलेलं नाही. पण त्यापूर्वी ठाण्यात शिंदे सेनेच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीला सर्व आमदार उपस्थित होते.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!