केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये दोन टप्प्यात होणार जनगणना, 11 हजार 718 कोटींचा बजेट मंजूर


पुणे: नुकत्याच झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत ३ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. जनगणना बजेट, CoalSETU आणि MSP याविषयी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडाने घेतलेल्या निर्णयानुसार,2027 मध्ये देशात आता जनगणना दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे.या महत्वपूर्ण कार्यासाठी केंद्र सरकारने तब्बल ११,७१८ कोटींचा बजेट मंजूर करण्यात आलं आहे.

देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होणार आहे.या देशव्यापी जनगणनेसाठी केंद्र सरकारकडून तब्बल 11,718 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही जनगणना २०२७ साली दोन टप्प्यात होणार आहे. यासाठी ३० लाख कर्मचारी काम करणार आहेत. या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरांची गणना होईल. पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर २०२६ पर्यंत होईल. तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना असेल. या जनगणनेची सुरुवात फेब्रुवारी,२०२७ मध्ये होईल. या जणगणनेसाठी डिजिटल डिझाइन डेटा सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे.

भारताची जणगणना देशाची लोकसंख्या, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि संसाधनाचे वितरण यांचं व्यापक सर्वेक्षण असणार आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांच्याद्वारे केले जाते.

भारताने २०२४-२५ साली एक अब्ज टनहून अधिक कोळशाचं उत्पादन केलं आहे. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात कोळशाची आयात करावी लागत होती. परंतु आता ही आयात मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे केंद्राचे ६० हजार कोटी रुपये वाचले आहेत. दरम्यान या डिजिटल जनगणनेमुळे धोरण करताना अचूक आकडेवारी उपलब्ध होणार आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!