सर्वात मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव, ओमराजेंसह 25 खासदार आक्रमक..

नवी दिल्ली : राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. यामुळे मदतीची मागणी केली जात आहे. असे असताना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्य सरकारची मोठी अनास्था असल्याचे प्रकरण समोर आलं आहे. राज्य सरकारने मदतीसाठी केंद्राला प्रस्तावच पाठवला नसल्याची माहिती पुढे
आली.
यामुळे एकच संताप व्यक्त केला जात असून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नेमकं करतात काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अतिवृष्टी अनुदानावरुन खडाजंगी पाहायला मिळाली. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संसदेत लेखी उत्तरात माहिती दिली.
यामुळे अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यात राज्य सरकारची गंभीर चूक असल्याचे दिसून आले. 14 लाख हेक्टरवर नुकसान झालं असताना केंद्राला मात्र 1.10 लाख हेक्टरचाच आकडा देण्यात आला. त्यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली.

कृषीमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिल्याचं ओमराजे यांनी म्हटलंय. याला 25 खासदारांनी पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारने प्रस्ताव वेळेत दिला असता तर तात्काळ मदत मिळण्यास मोठी मदत झाली असती, असे ओमराजे यांनी म्हटलं होतं. मात्र, राज्य सरकारने प्रस्ताव पाठवल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. त्यावरुन, विरोधक आक्रमक झाले होते.

त्यामुळे राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार कृषिमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत ओमराजे निंबाळकर यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. यामुळे कृषिमंत्री अडचणीत आले आहेत. हक्कभंगाच्या प्रस्तावावर सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाड, अनिल देसाई, प्रतिभा धानोरकर, बळवंत वानखेडे, कल्याण काळे, संजय दिना पाटील, रवींद्र चव्हाण, अमर काळे, प्रशांत पडोले, बजरंग सोनावणे, निलेश लंके, प्रणिती शिंदे, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, धैर्यशील मोहिते पाटील, इत्यादी खासदारांच्या सह्या आहेत.
