40 वर्ष गुन्हेगारीत असणाऱ्या आंदेकरच्या कुटुंबातील दोन जणांना निवडणुकीचं तिकीट मिळणार? शहराध्यक्षांचं सूचक वक्तव्य


पुणे:पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही आजची नाहीतर गेल्या 40 वर्षापासून ते गुन्हेगारी क्षेत्रात आहेत. आयुष कोमकर प्रकरणात आंदेकर कुटुंबीय चांगलेच चर्चेत आले.आता पुणे महापालिका निवडणुकीसाठी आंदेकरच्या कुटुंबातील दोन जणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळणार असल्याचे संकेत शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्यावर स्वत:च्या नातवाचा खून घडवून आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बंडू आंदेकर हा जेलमध्ये आहे. तसेच त्याचे इतर कुटुंबिय देखील न्यायालयीन कोठडीत आहेत. पण आता आगामी काळात पुणे महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी जेलमध्ये असलेल्या आंदेकर कुटुंबियांनी निवडणुकीसाठी कोर्टाची परवानगी मिळवली आहे.

पुण्याच्या विशेष मकोका न्यायालयाने आंदेकर कुटुंबियांना निवडणूक लढण्यासाठी मंजुरी दिल्याची माहिती काल समोर आली होती. यानंतर बंडू आंदेकर वगळता त्याची भावजयी माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सून तथा दिवंगत माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर या दोघींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीचं तिकीट देण्यासाठी सकारात्मक असल्याची चर्चा आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षांच्या वक्तव्यावरुनच संबंधित चर्चांना उधाण आलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “बंडू आंदेकर यांच्या व्यतिरिक्त आंदेकर कुटुंबातील इतर कोणत्या व्यक्तीने आमच्याकडे उमेदवारी मागितल्यास आम्ही त्यावर विचार करून निर्णय घेऊ”असं सुभाष जगताप यांनी सांगितलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!