शिंदवणे येथे ट्रकची दुचाकीस्वारांना धडक; 100 मीटरपर्यंत फरफटत नेले…., 20 वर्षीय दोन तरुण गंभीर जखमी

उरुळी कांचन : जेजुरी – उरुळी कांचन रस्त्यावरील शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ट्रक थांबला नाही आणि त्याने दुचाकीला 100 मीटरपर्यंत फरफटत नेले. शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकवस्ती परिसरात रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात्त झाला.
सार्थक विजय ढमढेरे, (वय-20) व प्रणव संभाजी ढमढेरे (वय -20) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. सदरची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार उद्धव गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम व कस्तुरी रुग्णवाहिकेचे संतोष झोंबाडे यांनी तात्काळ दोघांना उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक ढमढेरे, प्रणव ढमढेरे व त्यांचा आणखी एक मित्र असे तिघेजण नारायणपूर (ता. पुरंदर) येथे देवाचे दर्शनासाठी दुचाकीवर गेले होते. संध्याकाळी उशिरा नारायणपूरवरून घरी तळेगाव ढमढेरे या ठिकाणी निघाले होते. शिंदवणे घाटातून पुढे आले असता वाकवस्ती परिसरात उरुळी कांचन बाजूकडून जेजुरीकडे जाणाऱ्या बाजूकडे भरधाव ट्रक 100 च्या स्पीडने निघाला होता.

दरम्यान, समोरून येणाऱ्या दुचाकीला ट्रकचालकाने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणाने उडी मारली. तर दोघेजण थेट ट्रकच्या समोरील भागाला दुचाकीसह धडकले. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकचालकाने दुचाकी 100 ते 125 फुट फरफटत नेली. तर दुचाकीवरील दोघेजण दोघेजण गंभीर जखमी झाले. पाठीमागे उडी मारलेल्या तरुणाचे नाव अद्याप समजू शकले नाही. तसेच तो किरकोळ जखमी झाला.

सदर अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार उद्धव गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानुसार कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम व कस्तुरी रुग्णवाहिकेचे संतोष झोंबाडे यांनी तात्काळ दोघांना उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले.
