मोठी बातमी! ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा आमरण उपोषण करणार, सरकारची अडचण वाढणार?


पुणे :ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे नववर्षात पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी या संदर्भात आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना पत्र लिहिलं आहे. आपल्या या पत्रामध्ये आपण लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,30 जानेवारी 2026 पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरामध्ये अण्णा हजारे उपोषणाला सुरुवात करणार आहेत. दरम्यान अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यामुळे आता सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे अण्णा हजारे यांच्या या मागणीवर आता सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांना अण्णा हजारे यांनी पत्र लिहीत त्यांचा -त्यांच्या राज्यात मुख्यमंत्र्यांनी लोकायुक्त कायदा करावा अशी सूचना पंतप्रधानाकडून देण्यात आली होती. तरीही महाराष्ट्रात आतापर्यंत हा कायदा का नाही झाला? असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जावा अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

आपण लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 28 डिसेंबर 2022 ला विधानसभेत आणि 15 डिसेंबर 2023 ला विधानपरिषदेत विधेयक मंजूर होऊन देखील अंमलबजावणी होत नसल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. विधेयक मंजूर होऊन दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला, तरी अंमलबजावणी होत नसल्याने आता अण्णा हजारे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

       

दरम्यान विधेयक मंजूर झालं मात्र या विधेयकाची अंमलबजावणी करण्याची सरकारची इच्छा दिसत नसल्याचं या पत्रामध्ये अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!