शेकापच्या प्रवक्त्यांनी बॉम्ब फोडला; महेंद्र दळवी-गोगावलेंकडे पैशांची बॅग, वातावरण तापणार?

पुणे: शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कॅशबॉम्बनंतर आता आणखी एका मंत्र्याचं प्रकरण समोर आलं आहे.शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे ऐन अधिवेशनाच्या काळात शिंदे गटाच्या अडचणीत वाढ होणार आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पुन्हा थेट गंभीर आरोप केलेत. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून कालच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी यावेळी आपली पार्श्वभूमी स्पष्ट करत सांगितले की, सर्वाधिक गुन्हे असलेले हे आमदार आहेत.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, भरतशेठ गोगावले कॅश बॉम्ब नंबर २… हे चीटर आमदार आहेत, याविषयी कायम सुनील तटकरे बोलत आले आहेत. आमच्या मतदारसंघात सगळीकडे विकासकमे अर्धवट आहे. कंत्राटदर आमदाराच्या कमिशनमुळे दबले आहेत, असे देखील चित्रलेखा पाटील म्हणाल्या.

दरम्यान या बॉम्बमुळे रायगडचं राजकारण चांगलंच पेटल आहे. रायगडच्या महायुतीत गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्षात या व्हिडीओमुळे नवी ठिणगी पडली आहे. सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्या आहेत.

