धिप्पाड पंजाब केसरी भूपेंद्र सिंहला सिकंदर शेखने दाखविले आस्मान ; सोलापूर जिल्ह्यातील ‘भिमा केसरी’ बहुमान…!

सोलापूर : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ‘भीमा केसरी’ स्पर्धेत पंजाबच्या नामवंत मल्लाला माती चारत सिकंदर शेखने आस्मान दाखविले आहे.
महाराष्ट्र केसरी एवढ्याच भव्यरितीनं आयोजित केलेल्या या भीमा केसरी स्पर्धेकडे सिकंदर आणि महेंद्र यांच्या उपस्थितीमुळं अवघ्या महारष्ट्राचं लक्ष लागलं होतं. यात सिकंदर ने भूपेंद्र सिंहला आस्मान दाखविले आहे.
पंजाबचा सहा फूट उंच आणि धिप्पाड असा भूपेंद्रसिंह अजनाला याच्याविरुद्ध सिकंदर शेख भिडणार होता. भूपेंद्रसिंह अजनाला आखाड्यात उताराला तेव्हा सर्वच कुस्ती शौकिनांना सिकंदरची काळजी वाटू लागली होती. सुरुवातीला भूपेंद्रने सिकंदर याच्यावर आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर सिकंदरने आपला ठेवणीतला खेळ सुरु करत डावपेचात टाकत भूपेंद्रला चितपट करत ‘भीमा केसरी’ खिताब पटकावला.
सिकंदर ‘विसापूर केसरी’ चाही मानकरी
गेल्या आठवड्यातट सिंकदरने सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील ‘विसापूर केसरी’चे मैदान मारलं होतं. त्यावेळी सिकंदर शेखने मोळी डावावर पंजाबचा पैलवान नवजीत सिंगला लोळवले होते. अवघ्या पाचच मिनिटात सिकंदरने कुस्ती करत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे पारणे फेडले. या विसापूर केसरीसाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून मल्ल आले होते. त्यामुळं या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं.