पुण्यात 78 वर्षांच्या आजोबांच्या कृत्याने सगळेच हादरले, झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग आला अंगलट…

पुणे : एका 78 वर्षीय वृद्धाला गांजा विकताना रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार पुणे जिल्ह्यातील तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे गावातून समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवलाख उंबरे येथील धर्माजी बधाले नावाचा व्यक्ती परिसरात गांजाची विक्री करत होता. त्यानुसार, पोलिसांनी शनिवारी सापळा रचून त्याची झडती घेतली.
त्यांच्या तपासणीमध्ये 200 ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा आढळून आला, जो त्यांनी विक्रीसाठी ठेवला होता. या छाप्यात पोलिसांनी संबंधित वृद्ध व्यक्तीकडून अमली पदार्थ जप्त केले आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली.

गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार श्यामसुंदर गुट्टे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या संपूर्ण घटनेची तक्रार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 चे पोलीस अंमलदार श्यामसुंदर गुट्टे यांनी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.

