मोठी बातमी!वडिलोपार्जित जमिनीची मोजणी अवघ्या 200 रुपयात,शेतकऱ्यांना दिलासा

पुणे : भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता माफक दरात होणार आहे.वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणीसाठी म्हणजे केवळ प्रति पोटहिस्सा 200 रुपयांत होणार आहे. राज्य सरकारच्या नवीन निर्णयांची माहिती संबंधित जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाला देण्यात आली आहे. या नवीन निर्णयाचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वडिलोपार्जित पोटहिस्सा मोजणीसाठी यापूर्वी 1 हजार रुपये ते 14 हजार रुपयांपर्यंत खर्च येत होता. या मोठ्या खर्चामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भारत पडत होता. केवळ मोजणीसाठी त्यांना मोठी रक्कम मोजावी लागत होती. भूमी अभिलेख विभागाने आता शुल्क संरचनेत मोठा बदल केला आहे. पोटहिस्सा मोजणीसाठी आता केवळ 200 रुपये खर्च येणार आहे. हा निर्णय आता राज्यभर लागू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात पोटहिस्सा मोजणीसाठी जेव्हा अर्ज येईल, तेव्हा त्यासाठी शेतकऱ्यांना केवळ 200 रुपये द्यावे लागतील.महाभूअभिलेख संकेतस्थळावर शेतकऱ्यांना आता नवीन दरांची माहिती दिसेल. तसेच एकत्र कुटुंब पोटहिस्सा मोजणी हा पर्याय सुद्धा समाविष्ट करण्यात आला आहे. ई-मोजणी व्हर्जन 2.0 या संगणक प्रणालीतही अद्ययावत बदल करण्यात आले आहेत. जमिनीचे वाद कमी करण्यासाठी सरकारने हा बदल केला आहे

. सरकारच्या या निर्णयामुळे पोटहिस्सा मोजणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे. कुटुंबातील जमिनीच्या वाटणी संदर्भातील वाद यामुळे कुटुंबातील सदस्यांचा खिसा खाली होणार नाही. जमाबंद आयुक्त आणि भूमि अभिलेख विभागाच्या संचलाकांनी या संदर्भातील पत्र जारी केले आहे.
यापूर्वी प्रतिहिस्सा मोजणी ही दोन प्रकारात होत होती. एक साधी आणि एक जलद अशा दोन प्रकारे मोजणी होत होती. त्यासाठी त्याप्रमाणे शुल्क आकारण्यात येत होते. जलद मोजणीसाठी शेतकरी कुटुंबातील सदस्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत होता. आता हा खर्च कमी झाला आहे.
