कोल्हापूरात क्रिकेट खेळताना १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, बॉल शोधण्यासाठी गेला अन् घडलं विपरीत..


कोल्हापूर : खेळताना घरावर गेलेला चेंडू आणण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय शाळकरी मुलाचा हाय वोल्टेज लाइनच्या संपर्कात आल्याने, विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाला. अफान असिफ बागवान, असं या मृत मुलाचं नाव आहे.

दरम्यान, या घटनेने अफानच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी हृदयद्रावक घटना घडली, या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली.

शाळेला सुट्टी असल्याने आईला विचारून एक चिमुकला आपल्या मित्रांसोबत उत्साहात खेळत होता, पण क्रिकेट खेळण्याच्या नादात शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागला. मयत मुलाचे नाव अफान असिफ बागवान असं आहे. त्याच वय फक्त १३ वर्ष होतं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

       

खेळ सुरू असताना त्यांचा बॉल शेजारील हनुमंत खांडेकर यांच्या इमारतीच्या टेरेसवर गेला. तो बॉल आणण्यासाठी अफान टेरेसवर गेला. याच इमारतीवरून विमानतळाला वीज पुरवठा करणारी ११००० व्होल्ट क्षमतेची उच्चदाब वाहिनी जात होती. या चिमुकल्याचं त्याकडे लक्षही गेलं नाही.

टेरेसच्या अगदी दीड-दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या या विद्युत वाहिनीचा त्याला संपर्क होताच, त्याला जोराचा विद्युत धक्का बसला. विद्युत धक्का इतका जबर होता की, दुर्दैवाने या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!