वातावरण तापलं! मनसेच्या नेत्याला भाजप पदाधिकाऱ्यांची मारहाण;काय आहे प्रकरण?

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. निवडणुकांच्या निकालाची संपूर्ण राज्यात वाट पाहत आहेत. अशातच आता उरण येथील मनसेच्या पदाधिकाऱ्याला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उरणचे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या समर्थकांडकून मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. मनसेच्या पदाधिकाऱ्याने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आरोप केले. उरणचे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या संदर्भात आक्षेपार्य बोलल्यामुळे मनसेच्या सतीश पाटील या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्याचं म्हणणे आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सतीश पाटील यांना आई समोरचं मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारहाण करून भाजप आमदार महेश बालदी यांची माफी देखील मागायला लावली. हा घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. दरम्यान, मनसेच्या पदाधिकाऱ्याने उरण पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली आहे.

उरण हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात स्थित एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. महेश बालदी हे उरणचे आमदार आहेत. ते पीडब्ल्यूपीआयचे प्रीतम जेएम म्हात्रे आणि शिवसेनेचे युबीटी उमेदवार मनोहर गजानन भोईर यांचा पराभव करत आमदर झाले.
