जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयातून मोठी अपडेट

पुणे: कष्टकऱ्यांचे आणि श्रमिकांचे नेते म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती अचानक बिघडली असल्यामुळे त्यांना पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यांची गंभीर अवस्था असल्याने त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल आहे. गेल्या दहा दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,डॉ. बाबा आढाव यांच्यावर सध्या पूना हॉस्पिटलमध्ये हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपूर्ण टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या वयामुळे आणि एकूण प्रकृतीमुळे डॉक्टरांची टीम त्यांच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. डॉ. बाबा आढाव यांची प्रकृतीबाबत त्यांच्या कुटुंबियाकडून माहिती देण्यात आली आहे.

डॉक्टर बाबा आढाव हे महाराष्ट्रातील सामाजिक आणि कामगार चळवळीतील एक मोठे व्यक्तिमत्व आहेत. ‘एक गाव, एक पानवठा’ यासारख्या सामाजिक कार्यामुळे तसेच असंघटित कामगार आणि कष्टकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या लढ्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.

