अवैध धंदेवाल्यांशी पुण्यातील दोन पोलिसांचा संपर्क; गुन्हे शाखेनं उचललं मोठं पाऊल, काय आहे प्रकरण?


पुणे : पुण्यातील पोलीस दलातून खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. मटका जुगार चालवणाऱ्या रॅकेटशी संपर्क ठेवण्याच्या गंभीर आरोपावरून गुन्हे शाखा युनिट -१ मधील २ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार शुभम जयवंत देसाई आणि अभिनव बापुराव लडकत अशी निलंबित झालेल्या पोलिसांची नावे आहेत.दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल यांनी केली आहेप्राथमिक माहितीनुसार, समर्थ पोलिसांनी १७ नोव्हेंबर रोजी अवैध मटका जुगार चालवणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला. तपासादरम्यान, यातील एकाचा मोबाईल तपासला असता त्याच्या मोबाईलमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क झाल्याचे आढळून आलं.अधिक पडताळणी करीत असताना हवालदार शुभम देसाई हे आरोपीच्या मोबाईलवर कॉल करत होते. या कॉलवर ते आरोपीबरोबर संशयास्पदरित्या संपर्कात होते हे दिसून आलं. हा संपर्क संशयास्पद पद्धतीने असल्याचं पोलिसांनी नमूद केलं. या फोन कॉल्सवरून पोलिसाचे आरोपीशी आणि चालवित असलेल्या धंद्याशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

. अखेर पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पोलीस हवालदार शुभम देसाई आणि अभिनव लडकत यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं. या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!