फुरसुंगी पोलीसांकडून अंतरराज्यीय चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, ८ गुन्ह्यांची उकल तर सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त…

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने अंतरराज्यीय चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद केला आहे. त्याचे बँकखात्यात असलेले चोरीतील ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम फ्रिज करण्यात आली असून चोरी करण्याकरीता वापरलेली दुचाकीसह इतर साधने असा एकूण १ लाख ३४ हजार ७८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी महेश लक्ष्मीकांत पुजारी (वय २१, रा. हत्तीकनबस, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) याला जेरबंद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची सविस्तर हकिकत अशी की २८ नोव्हेंबर रोजी विशाल यादव (रा. मळाईपार्क, फुरसुंगी, या. हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयातील घटनास्थळी व आजुबाजूस असलेल्या पत्र्याचे शेड असलेल्या दुकानामध्ये यापुर्वी ऑगष्ट २०२५ मध्येही अशाच प्रकारची घटना होऊन अंदाजे चार लाख रुपये चोरी झाले होते, त्याबाततही फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. एकाच ठिकाणी दोनदा चोरीची घटना घडल्याने पोलीसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी कंबर कसून सर्वतोपरी शोध घेऊ लागले. परिसरातील सीसीटीव्ही, गोपनिय बातमीदार यांचेकडून माहिती घेतली. चोरी करणारा अज्ञात आरोपीचा सीसीटीव्ही फुटेजवरून मिळालेल्या वर्णनाचे इसमांकडे तपास करण्यात येत होता. अज्ञात आरोपीचा शोध घेणे पोलीसांपुढे आव्हान निर्माण झाले होते.

फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांचे मार्गदर्शनामध्ये तपास पथक प्रभारी विष्णु देशमुख व त्याचे पथक अथक परिश्रम करून आरोपीचा माग काढत असताना पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस अंमलदार हेमंत कामथे यांना गोपनिय बातमीदाराकडून वरील गुन्हयातील प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमधील चोरी करणारे वर्णनाचा एक इसम संशयीतपणे भेकराईनगर बसस्टॉपसमोर, पुणे सासवड रोड, फुरसुंगी, पुणे येथे उभा आहे अशी माहिती मिळाली. प्राप्त बातमी वरिष्ठांना देवून त्यांचे आदेशाने बातमीचे ठिकाणी तपास प्रभारीसह पोलीस अमलदार असे तात्काळ जावून भेकराईनगर बसडेपोचे बाजुचे परिसरामध्ये शोध घेतला. इसमास पोलीसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याचे तयारीत असताना ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव व पत्ता
विचारला असता त्याने त्याचे नाव महेश पुजारी असे असल्याचे सांगितले.
त्याचेकडे येथे येण्याचे कारणाबाबत तपास केला असता त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याचेकडे विश्वासात घेवून गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्याने गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासामध्ये ताब्यातील निष्पन्न आरोपी महेश पुजारी याने यापुर्वीही त्याच ठिकाणी चोरी केली असून त्यातील आलेली रोख रक्कम मौजमजेसाठी खर्च करून उर्वरीत पैसे त्याचे बँकखाती जमा केले असल्याची माहिती मिळाली आहे. त्याप्रमाणे त्याचे बँकखातेची माहिती घेतली असता त्याचे बँकखाती पाच लाख रुपयेपेक्षा जास्त रक्कम असून ती चोरीतील असल्याची खात्री झालेने त्याचे बँक खाते फ्रिज केले आहे.
आरोपीने चोरी करण्याकरीता वापरलेली साधने त्यामध्ये स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी पाने, पक्कड, कपडे, होंडा शाईन दुचाकी असे एकुण १ लाख ३४ हजार ७८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडून फुरसुंगी पोलीस स्टेशनकडील यापुर्वीचे दोन गुन्हयांची उकल करण्यात फुरसुंगी पोलीसांना यश आले आहे. सराईत आरोपीविरुध्द यापुर्वी अक्कलकोट, सोलापूर, हुबळी (कर्नाटक) येथे एकुण ८ गुन्हे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरील आरोपीचे तपासकामी तपास पथकातील तांत्रिक विश्लेषण काम पाहणारे पोलीस हवालदार श्रीनाथ जाधव यांनी महत्वाची भुमिका पार पाडली आहे. गुन्हयाचा पुढील तपास विष्णु देशमुख, पोलीस उपनिरीक्षक हे करत आहे.
सदरची कामगिरी डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली अनुराधा उदमले, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, अमोल मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, राजेश खांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, हरिदास कदम, सागर वणवे, श्रीनाथ जाधव, पोलीस अंमलदार हेमंत कामथे, अभिजित टिळेकर, योगेश गायकवाड, विनायक पोमण, नितीन सोनवणे यांचे पथकाने केली आहे.
