नर्तकीवर पैसे खर्च करण्यासाठी चोरी करणाऱ्या चोराकडून 6 लाखाचे सोन्याचे दागिने जप्त, फुरसुंगी पोलिसांची कारवाई..

लोणी काळभोर : नर्तकी सोबतचे बैठकीचा व नाचगाण्याचा शौक असल्याने त्यासाठी पैसे खर्च करण्यासाठी जवळ पैसे नसल्याने चोरी करून नर्तकीवरती पैसे खर्च करणा-या एकास जेरबंद करुन फुरसुंगी पोलीसांनी त्यांचेकडून ६ लाख १४ हजार ४२० रुपये किमतीचे ५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी अभिजित मधुकर पठारे (रा. होळकरवाडी, हवेली, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहुल उत्तम पठारे (वय ३९, रा. होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे.) याला अटक करण्यात आली आहे. सदर दागिने चोरीचा गुन्हा ३ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील अज्ञात आरोपी व चोरीस गेले मुद्देमालाचा तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार असे शोध घेत असताना पोलीस हवालदार सागर वणवे व पोलीस अंमलदार अभिजित टिळेकर यांना गोपनिय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, राहुल पठारे याने गुन्हयातील चोरी केलेले काही सोने महंमदवाडी, पुणे येथील एका ज्वेलर्स मध्ये विक्री केले आहे.

सदर बातमी वरिष्ठांना राहुल पठारे याचा त्याचे राहते घराचे पत्त्यावर जावून शोध घेतला असता तो मिळून आला. त्याला फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे घेवून येवून त्याचेकडे तपास केला असता त्याने गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. चोरी करण्याचे उद्देशाबाबत तपास केला असता त्याने सांगीतले की, त्यास नर्तकी सोबतचे बैठकीचा व नाचगाण्याचा शौक असल्याने त्यासाठी पैसे खर्च करण्यासाठी जवळ पैसे नसल्याने त्याने चोरी केली आहे.

सदर गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्याने चोरी केलेल्या मुद्देमालातील काही सोने महंमदवाडी, पुणे येथील एका सोनारास विक्री करून त्यापोटी आलेली ३० हजार रुपये रक्कम स्वता:वरती खर्च केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने विकलेले सोने व उर्वरीत सोन्याचे दागिने असे एकुण लाख १४ हजार ४२० रुपये किमतीचे ५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने गुन्हयाचे पुरावेकामी जप्त करण्यात आले आहेत. पोलीसांचे कामगिरीचे फिर्यादी अभिजित पठारे व स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करित आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगीरी पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५ डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे फुरसुंगी पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख, महेश नलवडे यांचे सोबत पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सागर वणवे, श्रीनाथ जाधव, हरीदास कदम, सतिश काळे, महेश उबाळे, अभिजित टिळेकर, बिभिषण कुंटेवाड, वैभव भोसले यांचे पथकाने केली आहे.
