RBI चा कर्जधारकांसाठी मोठा निर्णय ; रेपो दरात ‘इतक्या’ टक्क्यांची कपात

पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरबीआयचा रेपो दर घसरून 5.25% वर आला आहे. त्यामुळे कर्जधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय रिझर्व्ह बँकेने यापूर्वी फेब्रुवारी, एप्रिल आणि जून महिन्यात कपात केली होती. याचा अर्थ या कॅलेंडर वर्षात आरबीआयने 6 मधील 4 बैठकीत व्याजदर कपातीच्या बाजूने कौल दिला आहे. आतापर्यंत 1.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दरात कुठलाही बदल केला नव्हता. आता रेपो दरात कपातीचा निर्णय घेतल्याने येत्या काळातही रेपो दरात अधिक घसरण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकताच आरबीआयने रेपो दरात 0.25% ची कपात केली असून त्यामुळे आरबीआयचा रेपो दर घसरून 5.25 टक्क्यांवर आला आहे.

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आर्थिक वर्ष 2026 साठी GDP वृद्धी दर अंदाज वाढवून तो 7.3 टक्के केला आहे. हा अंदाज यापूर्वी 6.8 टक्के इतका होता. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे संकेतच केंद्रीय बँकेने दिले आहेत. विकास दर सातत्याने वाढत असल्याचे आणि अर्थव्यवस्था वेगाने धावत असल्याचे संकेत आरबीआयने दिले आहे.

