नोकरी करता करता 20 हजार असे कमवा; जाणून घ्या ही स्मार्ट आयडिया, कोणीच सांगणार नाही…


पुणे : जर तुम्हाला नोकरी व्यतिरिक्त अजून कमाई करायची असेल. तर दुसरीकडे पार्ट टाईम काम करावे लागेल. पण प्रत्येकाला हे शक्य होत नाही. पण या काही आयडियामुळे तुम्ही सहज कमाई करु शकता. त्यासाठी मोठी मेहनत घेण्याची गरज नाही.

तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्ही कमाई करू शकता. त्यासाठी फार मोठा वेळ देण्याची, कष्ट करण्याची गरज नाही. या 5 दमदार व्यवसायातून तुम्ही घरबसल्या 20-25 हजारांपर्यंत सहज कमाई करू शकता. अर्थात त्यासाठी इंटरनेट, स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप यापैकी एक आणि कौशल्य असणं आवश्यक आहे.

जर तुमच्याकडे कंटेंट रायटिंग, ग्राफिक डिझायनिंग, वेब डेव्हलपमेंट वा डिजिटल मार्केटिंग सारखं कौशल्य असेल तर तुम्ही Fiverr, Upwork आणि या सारख्या इतर अनेक प्लॅटफॉर्मवर काम करु शकता. सुरूवातील छोट्या प्रकल्पापासून सुरूवात करून स्कीलच्या जोरावर क्लाईंट्स जोडू शकता. महिन्यात 10-12 तास देऊन तुम्ही आरामशीर 15-25 हजारांपर्यंत कमाई करू शकता.

       

जर तुम्ही एखाद्या विषयात तरबेज असाल. पारंगत असाल. तो विषय शिकवण्याची हतोटी तुमच्याकडं असेल तर तुम्ही गणित, विज्ञान वा इंग्रजी या सारख्या विषयाची ऑनलाइन ट्यूटरिंग घेऊ शकता. Vedantu, Unacademy सारख्या वा इतर प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून अथवा तुमचे स्वतःचे ऑनलाईन क्लास सुरू करून तुम्ही अधिकची कमाई करू शकता. हे क्लास खास करून आठवड्याच्या शेवटी असतात. त्यातून चांगली कमाई होऊ शकते. तुम्ही ऑफलाईनही शिकवणी घेऊ शकता.

फिरता उद्योग

जर तुम्ही ऑफलाईन काम करू इच्छित असाल तर आठवडी बाजारात नशीब आजमावता येईल. यामध्ये फ्ली मार्केट्स, मेळा, लोकल फेअर, आनंद मेळा यासारख्या ठिकाणी हाताने तयार केलेल्या वस्तू वा इतर गिफ्ट आयटमची विक्री करू शकता. यातून बाजाराचा अंदाज येईल आणि योग्य उत्पादनाद्वारे तुम्हाला कमाई करता येईल.

Affiliate Marketing

सध्या अनेक लोक Amazon अथवा Flipkart सारख्या ॲफिलिएट मार्केटिंगच्या माध्यमातून मोठी कमाई करत आहेत. त्यासाठी केवळ योग्य उत्पादनाला प्रोत्साहन देणे महत्त्वाचं आहे. इन्स्टाग्राम, युट्यूब, ब्लॉगिंग सारख्या ऑनलाईन उत्पादनाच्या मार्केटिंगद्वारे ही कमाई होते.

ड्रॉपशिपिंग

ड्रॉपशिपिंग या व्यवसायात तुम्हाला उत्पादन खरेदी करण्याचे अथवा त्याचा साठा करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. तुम्हाला केवळ ऑनलाइन ऑर्डर देऊन थर्ड पार्टीकडून डिलिव्हरी करावी लागते. Shopify आणि WooCommerce सारख्या साईटमुळं हे काम सोप झालं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!