लोणी काळभोर यथे एक कोटी रुपयांचा बनावट गुटखा कारखाना उध्वस्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई…


लोणी काळभोर : अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटेच्या सुमारास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत धडक कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांचा बनावट आरएमडी गुटखा तयार करणारा कारखाना उध्वस्त केला आहे. यामध्ये पोलिसांनी गुटखा तयार करण्यासाठी वापरले जाणारे सर्व साहित्य, कच्चा माल, प्रिंटेड पाऊच, बनावट सुगंधित तंबाखू, पान मसाला यासह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करत गुटखा रॅकेटला मोठा झटका दिला आहे.

गुरुवार (४ डिसेंबर) रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड यांच्या पथकाला पाटील वस्ती परिसरातील कांबळे वस्तीतील सुमित गुप्ता यांच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट आरएमडी गुटखा तयार केला जात आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी आज पहाटेच पथकाने गोडाऊनवर छापा टाकला.

त्यावेळी तेथे कारखाना चालवणारा रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २५) याच्यासह रामप्रसाद उर्फ बापू प्रजापती (वय ५०) अप्पु सोनकर (वय ४६) व दानिश खान (वय १८) हे गुटखा तयार करताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून गोडाऊनचा मालक सुमित गुप्ता फरार झाला आहे त्याचा शोध सुरू आहे.

       

गोडाऊनमध्ये आरएमडी गुटखा विमल गुटखा, सुगंधित तंबाखू, बनावट कच्चामाल, केमिकल, थंडक, गुलाबपाणी, बनावट सुपारी, पाऊच बॉक्स, पोती यांसह तब्बल १ कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुटखा वाहतूक करण्यासाठी खास तयार केलेल्या तीन कारही पोलिसांनी ताब्यात घेतल्या. यामध्ये इनोव्हा क्रमांक एमएच ४४ बी २०२३, इनोव्हा क्रमांक एमएच १२ डीएम ०८८५ व टाटा नेक्सॉन क्रमांक एमएच ओटी ८४६२ या तिन्ही मिळून सुमारे ५० लाखांच्या चारचाकी तसेच १ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदरची धाडसी कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड तसेच प्रशांत बोमादंडी संदिप जाधव रविंद्र रोकडे मयुर सुर्यवंशी चेतन गायकवाड उदय राक्षे सय्यद साहील शेख संदिप शेळके मच्छिंद्र धापसे परेश सावंत बबनराव केदार दिशा खेवलकर साधना पवार नितीन जगदाळे योगेश मांढरे अझीम शेख, युवराज कांबळे, आझाद पाटील प्रफुल्ल मोरे शेखर खराडे यांच्या पथकाने केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!