मुंढवा जमीन गैरव्यवहारात पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार, दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी..

पुणे : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये आता कॉमेडी कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत पोलिसांनी महत्वाची पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

यामध्ये आता पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून पाच दिवसांपूर्वीच दिग्विजय पाटील यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. नंतर दिग्विजय पाटील पुणे पोलीस आयुक्तालयात हजर राहिले. आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यामुळे आता पार्थ पवार देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

याबाबत सध्या मला परदेशात जय पवारांच्या लग्नाला जायचे असल्याने, लग्नावरून परत आल्यानंतर मी पुन्हा चौकशीसाठी येईन, असेही दिग्विजय पाटील यांनी सांगितले आहे. यामुळे काही दिवस चौकशी लांबली असल्याचे सांगितले जात आहे. दिग्विजय पाटील यांच्या चौकशीदरम्यान अनेक मुद्द्यांची तपासणी झाली आहे.

यामुळे आता पार्थ पवार यांच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या जय पवार यांचे लग्न असल्याचे पवार कुटुंब परदेशात आहे. जय पवारांच्या लग्नाला दिग्विजय पाटीलही उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.
असे असताना मात्र दिग्विजय पाटलांवरही जमीन प्रकरणात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत शीतल तेजवानीला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न आहे. यानंतर पार्थ पवार यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
